कराटे चॅम्पियनशिपमध्ये बार्देशातील मुलांना यश


20th May 2022, 11:47 pm
कराटे चॅम्पियनशिपमध्ये बार्देशातील मुलांना यश

पणजी : डब्ल्यूआयबीकेएफआय राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत मुख्य प्रशिक्षक विष्णू नाईक व इन्स्ट्रक्टर बुधाजी हसापुरकर यांच्या पेडणे, बार्देश येथील मुलांनी यश संपादन केले. राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये अनेक मुले सहभागी झाली होती. ही स्पर्धा न्हावेली येथील मनोहर पर्रीकर स्टेडियम येथे घेण्यात आली होती.

ही स्पर्धा काता व कुमेती अशा दोन विभागामध्ये घेण्यात आली होती. कुमेती या प्रकारात द्वितीय पारितोषिक दिवेश धारगळकर व नितेश नाईक यांना मिळाले. तृतीय क्रमांक तेजस नाईक, निधी नाईक व हायरन डिसोझा यांना प्राप्त झाले. चाैथे पारितोषिक यज्ञेश महाले याला मिळाले.

काता प्रकारात प्रथम पारितोषिक श्रेयश गावस, दिनेश धारगळकर, उपलक्ष  हसापूरकर, तेजस नाईक, निधीश नाईक व गितेश परवार यांनी प्राप्त केले. द्वितीय क्रमांकाचे स्थान नितेश नाईक, गाैरी बिचोलकर, निधी नाईक, यज्ञेश महाले व राजवीर नाईक यांना मिळाले. तृतीय पारितोषिक समृद्धी महाले, वेदांत व हायरन डिसोझा यांना मिळाले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कुडतरी आमदार आलेक्स रेजिनाल्ड उपस्थित होते. विजेत्यांना त्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले होते. ही स्पर्धा सुभाष शिरोडकर यांनी आयोजित केली होती. सर्व विद्यार्थ्यांना मुख्य प्रशिक्षक विष्णू नाईक व प्रशिक्षक बुधाजी हसापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.