राजस्थानचा ९ गडी राखून विजय : मुंबईची पराभवाची मालिका कायम

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
23rd April, 12:13 am
राजस्थानचा ९ गडी राखून विजय : मुंबईची पराभवाची मालिका कायम

जयपूर : आयपीएल २०२४ च्या ३८ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा ९ गडी राखून पराभव केला. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने ६० चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून ९ चौकार आणि ७ षटकार आले. तर कर्णधार संजू सॅमसन ३८ धावा करून नाबाद परतला.

 मुंबईने प्रथम खेळून १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानने ८ चेंडू शिल्लक असताना सहज लक्ष्याचा पाठलाग केला. जयस्वाल आणि बटलरचे झेल गमावणे मुंबईला महागात पडले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तर राजस्थानतर्फे गोलंदाजीत संदीप शर्माने शानदार गोलंदाजी करताना ४ षटकांत केवळ १८ धावा देत ५ गडी बाद केले.

नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने प्रथम खेळताना १९८ धावा केल्या. मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज अवघ्या ६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. या सामन्यात इशान किशनला एकही धाव करता आली नाही, तर दुसरीकडे रोहित शर्माने ६ धावा केल्या.      

या सामन्यात सूर्यकुमार यादवची जादूही चालू शकली नाही. संदीप शर्माने त्याला १० धावांवर बाद केले. ५२ धावा झाल्या तोपर्यंत मुंबईने ४ विकेट गमावल्या होत्या, परंतु येथून निहाल वढेरा आणि तिलक वर्मा यांच्यातील शानदार ९९ धावांच्या भागीदारीने मुंबई इंडियन्सला सामन्यात परत आणले. वढेराने २४ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ४९ धावांची शानदार खेळी खेळली.      

मुंबई इंडियन्स १३ षटकांत ४ विकेट गमावून १०१ धावांवर खेळत होती. येथून फलंदाजांनी तुफानी शैलीत फलंदाजी केली. १७व्या षटकात निहाल वढेरा बाद झाला असला तरी तिलक वर्माने आपली अर्धशतकी खेळी सुरूच ठेवली होती. १३व्या षटकानंतर पुढील ५ षटकांत संघाच्या ६९ धावा झाल्या होत्या. मुंबई २०० धावा सहज पार करेल असे वाटत होते पण शेवटच्या २ षटकांत राजस्थानकडून तगडी गोलंदाजी झाली. प्रथम १९व्या षटकात आवेश खानने केवळ ६ धावा दिल्या आणि शेवटच्या षटकात संदीप शर्माने ३ धावा दिल्या आणि ३ विकेट्स घेऊन मुंबईला १७९ धावांवर रोखले.      

राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी      

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना अडचणीत आणले होते. मुंबईने पहिल्या ४ विकेट्स ५२ धावांत गमावल्या होत्या. मात्र आवेश खान आणि युझवेंद्र चहल यांनाही मधल्या षटकांमध्ये चांगलाच फटका बसला. राजस्थानसाठी संदीप शर्माने सर्वाधिक ५ आणि ट्रेंट बोल्टने २ बळी घेतले. याच सामन्यात मोहम्मद नबीची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने आपल्या आयपीएल कारकिर्दीत २०० विकेट पूर्ण केल्या आहेत, पण त्याने ४ षटकांत ४८ धावाही दिल्या आहेत. त्याच्याशिवाय आवेश खाननेही महत्त्वाची विकेट घेतली.