पाकिस्तानची विश्वचकासाठी नवी चाल; गॅरी कर्स्टनवर लावला दाव

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
28th April, 07:08 pm
पाकिस्तानची विश्वचकासाठी नवी चाल; गॅरी कर्स्टनवर लावला दाव

कराची : आता पाकिस्तानी संघाला पांढरा चेंडू आणि लाल चेंडू क्रिकेटमध्ये वेगवेगळे प्रशिक्षक असतील. पीसीबीने मर्यादित षटकांच्या फॉर्मेटसाठी दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी यांची कसोटी फॉरमॅटसाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. 

२०२४ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तानी क्रिकेट संघात धक्कादायक बदल झाले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आपल्या कोचिंग स्टाफमध्ये बदल केले आहेत. गॅरी कर्स्टन हे तेच प्रशिक्षक आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

कर्स्टनना आयपीएलमध्ये कोचिंगचा अनुभवही आहे. गॅरी कर्स्टन हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत. याशिवाय त्यांना इंडियन प्रीमियर लीगमधील प्रशिक्षणाचाही भरपूर अनुभव आहे. ते २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे फलंदाजी प्रशिक्षक होते, पण पुढच्याच वर्षी त्यांना आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले. पण २ वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर, २०२२ मध्ये ते गुजरात टायटन्समध्ये फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून सामील झाले आणि त्याच मोसमात गुजरात संघ आयपीएल चॅम्पियन बनला. कर्स्टन अजूनही या संघाचा अविभाज्य भाग आहेत.