केरी ‘स्वामी विवेकानंद’ला विजेतेपद

वाळपई हनुमान विद्यालयातर्फे बॅडमिंटन स्पर्धा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st April, 12:10 am
केरी ‘स्वामी विवेकानंद’ला विजेतेपद

बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणाऱ्या केरी स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विजेत्यांसमवेत विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक विश्वास कवळेकर व इतर.            

वाळपई : वाळपई हनुमान विद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्तरी तालुका पातळीवर बॅडमिंटन स्पर्धेचे पहिले पारितोषिक केरी-सत्तरी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या विद्यालयाला मिळाले आहे. या स्पर्धेमध्ये सत्तरी तालुक्यातील एकूण सात विद्यालयांनी भाग घेतला होता. विद्यालयाच्या प्रांगणात सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते‌. स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी उपसभापती नरहरी हळदणकर यांच्या हस्ते करण्यात आले.             

यावेळी पारंपरिक समई प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी देवेश पेडणेकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुविद्या बर्वे, ज्येष्ठ शिक्षक विश्वास कवळेकर, उमेश काणेकर, प्रसाद वेलिंगकर, उल्हास मणेरकर विद्यालयाचे शारीरिक शिक्षक पांडुरंग गावकर शारीरिक ज्येष्ठ शिक्षक उदयकुमार पाटील आदींची उपस्थिती होती.             

या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक केरी  येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विद्यालयाच्या सरिता नाईक, संदेश नाईक व रामदास शेटकर यांना प्राप्त झाले. या स्पर्धेमध्ये सत्तरी तालुक्यातील एकूण सात विद्यालयांनी भाग घेतला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीसप्राप्त मुलांना बक्षिसे वितरित करण्यात आली.