राष्ट्रीय रग्बी स्पर्धा : गोव्यातील तीन संघांना जर्सी प्रदान


05th December 2021, 11:16 pm
राष्ट्रीय रग्बी स्पर्धा : गोव्यातील तीन संघांना जर्सी प्रदान

पणजी : डिसेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय रग्बी स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या गोव्यातील रग्बी संघांना रविवारी जर्सी प्रदान करण्यात आल्या. संघांचे प्रमुख प्रायोजक व्ही. एम. साळगावकर कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा रग्बी युनियनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात १८ वर्षांखालील मुली, मुलगे व पुरुष व महिलांचय संघाना जर्सी देण्या आली.

१० ते १२ डिसेंबर दरम्यान भुवनेश्वर, ओडिशा येथे होणाऱ्या ज्युनियर राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत १८ वर्षांखालील मुलांचा संघ सहभागी होणार आहे, तर महिला आणि पुरुष संघ १८ डिसेंबरपासून भुवनेश्वर, ओडिशा येथे पुन्हा होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करतील. व्ही. एम. साळगावकर कॉर्पोरेशनच्या इशिता आणि विक्रम साळगावकर यांच्या हस्ते आणि श्री. व सौ. ट्रॉटर यांच्या हस्ते जर्सी प्रदान करण्यात आल्या.

यावेळी साळगावकर म्हणाले, आम्ही गोव्यातील तरुणांना त्यांच्या आवडीच्या खेळात सहभागी होण्याची संधी देऊ इच्छितो. प्रायोजक नसल्यामुळे त्यांना कोणत्याही ठिकाणी तडजोड कराव लागू नये हाच आमचा प्रयत्न आहे.

मुख्य प्रशिक्षक मार्क फर्नांडिस यांनी सांगितले की, कनिष्ठ विभागात हा संघ ७व्या स्थानावर असून या संघाच्या क्रमवारीत सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. परीक्षांच्या कारणांमुळे मुलींचा १८ वर्षांखालील संघ स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही.