आम आदमी पक्षाची आजपासून ‘परिवर्तन यात्रा’

३०० सभांचे नियोजन : जाहीर केलेल्या योजनांबाबत करणार जागृती

|
26th November 2021, 12:11 Hrs
आम आदमी पक्षाची आजपासून ‘परिवर्तन यात्रा’

फोटो : पत्रकार परिषदेत बोलताना आपचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक. सोबत अमित पालेकर व सेसिल रॉड्रिग्ज.
पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने ‘परिवर्तन यात्रा’ या नवीन मोहिमेची घोषणा केली आहे. या यात्रेत पक्षाचे नेते पंचायतनिहाय सुमारे ३०० सभा घेणार आहेत. पक्षाची ध्येय-धोरणे, केजरीवाल मॉडेल, जाहीर केलेल्या योजना यांबाबत जागरूकता निर्माण करतील. या यात्रेचा शुभारंभ शुक्रवारी कळंगुट, वेळ्ळी आणि दाबोळी येथून केला जाणार आहे, अशी माहिती आपचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वाल्मिकी नाईक पुढे म्हणाले, पक्षाला मिळालेला प्रतिसाद पाहून भाजप आणि काँग्रेस घाबरली आहे. ते दोघे निवडणूकपूर्व सेटिंगमध्ये व्यग्र असताना आप लोकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काम करत आहे. स्थानिक नेत्यांना प्रचाराची धुरा सांभाळता येत नाही म्हणून भाजपचे पक्षश्रेष्ठी राष्ट्रीय नेत्यांना गोव्यात पाठवत आहेत. पराभवाची त्यांना चाहुल लागली आहे. आपचा दीड वर्षांपासून प्रचार सुरू असून अाता घरोघरी प्रचार सुरू आहे. लोकांना आता आप हा एकमेव पर्याय वाटत आहे. गोव्याला प्रामाणिक प्रशासनाची गरज आहे आणि ती फक्त आपच देऊ शकतो, हे त्यांच्या लक्षात आले आहे.
...
‘परिवर्तन यात्रा’ सामान्य लोकांशी जोडण्यासाठी आयोजित केली आहे. आमच्यासारखे सामान्य लोक कधीच राजकारणात नव्हते; पण राज्याची स्थिती पाहून अनेकांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला आहे. राज्यात बदल घडवून आणण्याचा आम्ही संकल्प केला आहे.
_ अमित पालेकर, नेते, आप