एनसीबीच्या समीर वानखेडेंना दिलासा

अटकेपूर्वी तीन दिवस कल्पना देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश


28th October 2021, 11:19 pm
एनसीबीच्या समीर वानखेडेंना दिलासा

फोटो : समीर वानखेडे
मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण समोर आल्यानंतर सुरू असलेल्या आरोप-प्रत्योरापांच्या अनुषंगाने मुंबईतील विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी आल्या आहेत. त्यांची एकत्रित चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून बुधवारी तपास पथक नेमण्यात आले आहे. अटकेची शक्यता लक्षात घेऊन एनसीबीचे मुंबई प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. अटक करण्याची गरज भासल्यास ७२ तास आधी नोटीस देण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे वानखेडे यांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा