आर्यन खानला जामीन मंजूर

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

|
28th October 2021, 11:18 Hrs
आर्यन खानला जामीन मंजूर

फोटो : आर्यन खान
मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अखेर अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांनाही न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी जामीन मंजूर केला असून तिघांनाही विशेष अटी घातल्या आहेत. याबाबतचा सविस्तर आदेश नंतर उपलब्ध होईल, असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. दरम्यान, जामीन आदेशाची प्रत शुक्रवारीच उपलब्ध होणार असल्याने आर्यन खानला आजची रात्रही आर्थर रोड तुरुंगातच काढावी लागणार आहे.