पर्रा येथे ३ किलो गांजा जप्त; ओडिशाच्या संशयितास अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th October 2021, 11:33 Hrs
पर्रा येथे ३ किलो गांजा जप्त; ओडिशाच्या संशयितास अटक

म्हापसा : पर्रा येथे अमलीपदार्थ विरोधी कारवाईखाली म्हापसा पोलिसांनी बियांती गंथिरत्न माळी (२९, ओडिशा) या संशयितास अटक केली. संशयिताकडून ३ लाखांचा ३ किलो १० ग्रॅम गांजा जप्त केला.      

 पोलिसांनी पर्रा येथे अमलीपदार्थ विक्री व्यवहार होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी बियांती माळी यास रंगेहात पकडून ताब्यात घेतले. झडतीवेळी त्याच्याजवळ ३.१० किलो गांजा सापडला.      

संशयिताविरुद्ध पोलिसांनी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा कलम २०(बी)(२)(बी) अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यास अटक केली.      

 पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गौरव नाईक, विभा वळवईकर, रिचा भोसले, हवालदार सुशांत चोपडेकर, शिवाजी शेटकर, शिपाई प्रकाश पोळेकर, अभिषेक कासार, राजेश कांदोळकर, अक्षय पाटील व पंकज परब या पथकाने केली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.