महादेव घाडीला ४ दिवसांची पोलीस कोठडी

|
19th October 2021, 12:29 Hrs

फोंडा : येथील कामत रेसिडेन्सीमध्ये राहणार्‍या कामत भगिनींचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित आरोपी महादेव घाडी याला फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. 

फोंड्यातील कामत रेसिडेन्सी इमारतीत राहणार्‍या दोन सख्ख्या वयोवृद्ध बहिणींचा खून आर्थिक देवाण घेवाणीतून झाल्याचे अधीक्षक पंकज कुमार सिंह यांनी रविवारी फोंडा येथे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत प्रभारी उपअधीक्षक उदय परब आणि निरीक्षक मोहन गावडे उपस्थित होते. संशयित महादेव घाडी (३४, रा. बायें सुर्ला) याने जुगारासाठी मंगला कामत आणि जीवन कामत यांच्याकडून पैसे उधार घेतले होते. ते पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्यामुळेच त्या वयोवृद्ध बहिणींचा खून केल्याची कबुली संशयिताने दिली होती.