सर्व बुक स्टॉलवर उपलब्ध : गोव्यातील शहरांचे पूर्वीचे रूप दाखवणारे लेख वाचनीय
‘गोवन वार्ता’ दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत संपादक पांडुरंग गावकर, रवींद्र पाटील आणि अमित पोकळे.
...
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्यातील महत्त्वाच्या शहरांचे जुने रूप, जुन्या काळातील रचना, राहणीमान यावर आधारित संग्राह्य लेखांचा समावेश असलेल्या ‘गोवन वार्ता’ दिवाळी अंकाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते रविवारी प्रकाशन झाले. दर्जेदार लेख व नवनवीन कल्पनांमुळे यापूर्वी ‘गाेवन वार्ता’ दिवाळी अंकांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्याला ‘गोवन वार्ता’चे संपादक पांडुरंग गावकर, जाहिरात विभागाचे उपसरव्यवस्थापक (डीजीएम) रवींद्र पाटील, जाहिरात व्यवस्थापक अमित पोकळे उपस्थित होते. प्रकाशनानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी अंकाची सजावट तसेच लेखांवर धावती नजर टाकली.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर १४ वर्षांनी पोर्तुगीजांच्या राजवटीतून गोवा मुक्त झाला. मुक्तीनंतर गोव्याने भरीव प्रगती केलेली आहे. या प्रगतीमुळे पणजी, मडगाव, म्हापसा, डिचोली या सर्व शहरांचा विकास झालेला आहे. सर्व शहरांनी कात टाकली आहे. मठग्राम म्हणून ओळखले जाणारे मडगाव पूर्वी कसे होते, त्याची कल्पना ‘मठग्राम ते मडगाव’ हा लेख वाचल्यानंतर येणार आहे. पूर्वीच्या बाजारपेठेचे स्वरूप, संस्कृती, मराठी शाळा यांचीही स्थिती हा अंक वाचल्यानंतर येणार आहे. अंकात दर्जेदार कविता व ललीत लेखांचाही समावेश आहे. १३२ पानी असलेल्या या अंकाची किंमत फक्त १५० रुपये आहे. हा अंक राज्यातील सर्व बुक स्टॉलवर उपलब्ध आहे.
अंंकातील आकर्षण...