बनावट मुखत्यारपत्र : संशयिताला मिळाला अंतरिम दिलासा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
13th October 2021, 12:18 Hrs
बनावट मुखत्यारपत्र : संशयिताला मिळाला अंतरिम दिलासा

पणजी : मोपा विमानतळ प्रकल्प क्षेत्रातील कासारवर्णे येथील कथित जमीन प्रकरणी 

लक्ष्मी मडवळ या मृत महिलेची खोटी सही व बनावट मुखत्यारपत्राद्वारे जमिनीची विक्री, 

फेरफार व नंतर सरकारकडून भरपाई घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. 

या प्रकरणातील संशयित कॅनेथ सिल्वेरा याने उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात 

अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, न्यायालयाने संशयित सिल्वेरा याला 

अटक न करण्याचा अंतरिम दिलासा दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ 

ऑक्टोबर रोजी ठेवली आहे. या प्रकरणी नागरी उड्डाण खात्याचे संचालक सुरेश शानबाग 

यांनी पेडणे पोलीसस्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार वास्को येथील 

व्यावसायिक कॅनेथ सिल्वेरा यांनी फ्रेन्सी आग्नेलो गोन्साल्वीस, उमेश दत्ताराम गाड, अ‍ॅड. 

संजीव सरदेसाई, पेडणे येथील उपनिबंधक आणि पेडण्याचे मामलेदार यांनी षड्यंत्र रचून 

मूळ जमीन मालक लक्ष्मी मडवळ यांच्या जमिनीबाबत बनावट मुखत्यारपत्र तयार केले 

आणि जमिनीची वाढीव भरपाई मिळावी म्हणून बनावट कागदपत्र तयार केले होते.