‘थींक इम्पेक्ट’चा आदर्श ठेवणारी “रोट. निशिता पेडणेकर”

‘आय.ए.एम, ऍक्ट अचिव’ - जिल्हा थीम लोगोच्या निर्मितीसाठी जागतिक रेकॉर्ड प्रयत्नांसाठी प्रकल्प अध्यक्ष म्हणून काम केले व लोगोसाठी बांगड्यांचा वापर करुन एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया यशस्वीरित्या पार केली.

Story: मार्ग नवा, ध्यास नवा/ सुश्मिता मोपकर |
09th October 2021, 11:30 pm
‘थींक इम्पेक्ट’चा आदर्श ठेवणारी  “रोट. निशिता पेडणेकर”


वाचन, गायन, नृत्य, संगीत, प्रवास करणे, क्रिकेट, टेबल टॅनिस, बॅटमिंटन हे खेळ खेळणे असे सर्व क्षेत्रातील छंद बाळगणारी निशिता खोर्ली-म्हापसा येथील रहिवासी आहे. म्हापसा येथील सेंट मेरीज कॉन्वेंट हायस्कूल व ज्ञानप्रसारक मंडळाचे कुशे उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी व बारावीचे तिने शिक्षण घेतले. सेंट झेवियर्स महाविद्यालयात विज्ञान शाखेतून ‘कम्प्यूटर सायन्स’ या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. पुढे गोव्यातील आसाम डॉन बॉस्को विद्यापीठातून कम्प्यूटर ऍप्लीकेशनमध्ये पदव्यूत्तर झाली. महाविद्यालयात असताना आंतर-महाविद्यालयीन मुलींच्या क्रिकेट संघात सहभागी होऊन उपविजेतेपद मिळविले आहे. तसेच अनेक महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. गोव्यात लोकमत टाईम्सने आयोजित केलेल्या ‘मीस युवा नेक्स्ट गोवा’ ही उपाधी तिने जिंकली आणि पुढे तिने याच स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर गोव्याचे प्रतिनिधित्व केले.

विविध गुणांनी सजलेली ही तरूणी नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यात तत्पर असते. दुसऱ्यांचा आदर करणे , शिस्तबद्धता, शिक्षणातील सातत्यता, अनुभूतीतून सुधारणा करणे, प्रभावी संप्रेषण, कामासाठी वचनबद्ध, वेळेला महत्त्व देणे असे अनेक गुण तिच्यात आहेत.

तिला आपले काम व तांत्रिक कौशल्य दाखविण्याची संधी ई-मेल मार्केटींगच्या माध्यमातून मिळाली. त्याचप्रमाणे फोटोशॉप व इलस्ट्रेशन, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मिडीयाच्या स्थळांवर कंपनीच्या ग्राहकांसाठी तिने ऑनलाईन कलात्मक प्रचार आणि मोहिमा राबविल्या आहेत. ‘टी अँड टॉनिक’मध्ये सोशल मिडीया आणि ‘पी.आर ऍक्सेक्युटीव्ह’ व ‘व्हाय. एस. एम. प्रायवेट लिमिटेड’ कंपनीमध्ये सोशल मिडीया आणि मार्केटिंग ऍक्सेक्युटीव्ह म्हणून काम केले आहे. तसेच ‘इंप्रेशन – ट्रेजर ऑफ लव्ह’मध्ये संचालक म्हणून काम केले आहे.

२०१२-२०१३ मध्ये ती म्हापसाच्या रोटरॅक्ट क्लबमध्ये सामील झाली आणि तिथून तिच्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळाले. रोटरॅक्टद्वारे तिला अनेक नवनवीन संधी मिळाल्या. या संधींचे सोने करुन तिने आपल्या जीवनाच्या वाटचालीत एक उच्च स्यान मिळविले. क्लबमध्ये सामील झालेल्याच वर्षी तिला ‘उत्कृष्ट उत्साही रोटरॅक्टर’चा किताब मिळाला. २०१३-१४ मध्ये क्लबची संयुक्त सचिव म्हणून काम सांभाळले व त्याच वर्षी ‘उत्कृष्ट रोटरॅक्टर’चा मानही मिळाला. २०१४-१५ मध्ये रोटरॅक्ट क्लबची अध्यक्षा होऊन विविध माध्यमातून नाव कमावले. आपल्या अध्यक्षतेखाली गोव्यात ४२वी जिल्हा मंच आणि डी. आर. आर. स्थापना – ‘शिकार- दी समीट ऑफ ऍक्सलन्स’ या कार्यक्रमाचा कार्यभार सांभाळला. तसेच त्या वर्षापर्यंतची नोंद खंडित करुन तिने ४०४ प्रकल्प राबविले. रोटरॅक्ट डिस्ट्रीक्ट ३१७० साठी सर्वप्रथम ‘जिल्हा सांस्कृतिक उत्सव – मृदंगम्’ हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. अध्यक्षपद सांभाळित असतानाच ‘स्पीरीट ऑफ इन्स्पीरेशन’, ‘उत्कृष्ट क्लब-स्टार क्लब’ असे किताबही मिळविले.

महादान-रक्तदान कार्यक्रमात संचालकाचे पद सांभाळून एशिया वर्ल्ड रेकॉर्डधारक झाली. श्रीलंका येथे संपूर्ण दक्षिण-पूर्व एशिया खंडाच्या रोटरॅक्टरच्या रोटासिया २०१५ या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याचीही संधी तिला तिच्या कर्तृत्वाने मिळाली. त्याचबरोबर ‘मीस रोटासिया २०१५’ हा किताब मिळविण्यासाठी पाच स्पर्धकांपैकी एक होती. हे सगळे एखादा कष्टाळू आणि जिद्द धरुन ध्येयमार्ग गाठणाराच करु शकतो आणि ते ह्या उत्साही तरुणीने करुन दाखविले आहे. एवढेच नव्हे तर यानंतर अशा अनेक सुवर्णसंधींशी जुळवून घेऊन कार्य केले व यश मिळविले.

२०१५-१६ साली रोटरॅक्ट डिस्ट्रीक्ट ३१७० साठी ‘चीफ एड टू डीआरआर’ आणि जिल्हा पुरस्कार समितीची अध्यक्ष म्हणून काम सांभाळले. त्याचबरोबर रोटरॅक्ट डिस्ट्रीक्ट ३१७० साठी पदं सांभाळून अनेक नामांकित कार्यक्रम केले. जसे की, डीआरआर सई देखणेच्या ‘परमळ – दी फ्रेग्रंस ऑफ सक्सेस’ या ४५व्या जिल्हा पातळीवरील परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले आहे. ‘आय.ए.एम, ऍक्ट अचिव’ - जिल्हा थीम लोगोच्या निर्मितीसाठी जागतिक रेकॉर्ड प्रयत्नांसाठी प्रकल्प अध्यक्ष म्हणून काम केले व लोगोसाठी बांगड्यांचा वापर करुन एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया यशस्वीरित्या पार केली. पाडीडीआर सई देखणेच्या कार्यकालात तिला ‘उत्कृष्ट महिला रोटरॅक्टर पुरस्कार’ व ‘उत्कृष्ट बोर्ड सदस्य पुरस्कार’ प्राप्त झाले. २०१८ मध्ये रोटरॅक्ट झोन इंस्टीट्यूट, मुंबई येथे डीआरआरच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाली. रोटरी झोन इंस्टीट्यूट, चेन्नई येथे रोटरी इंटरनेशनल प्रेसिडंट बॅरी रॅसाॅन यांच्यासोबत बैठकीत सहभागी झाली.

दक्षिण-पूर्व एशिया खंडाचा ‘रोटासिया’ हा कार्यक्रम २०१९ साली गोव्यात आयोजित करण्याची बोली तिने पुणे येथील २०१८च्या रोटासियात जिंकली. यातून तिच्यातील उच्च पातळीवर नेतृत्व करण्याचे गुण आणि एवढ्या मोठ्या कार्यकुशल माणसांचा तिच्यावरील विश्वास दिसून येतो. आणि २०१९मध्ये रोटासियाची ‘पहिली महिला होस्ट डीआरआर’ ठरुन, इतरांच्या विश्वासाला खरी उतरुन स्वतःला सिद्ध करुन दाखविले. जानेवारी २०१९मध्ये सान. डायगो यू.एस.ए.त झालेल्या ‘रोटरी आंतरराष्ट्रीय असेंबली २०१९’ साठी भारतातून आमंत्रित केलेली तसेच, जून २०१९ मध्ये हेम्बर्ग, जर्मनी येथे ‘रोटरॅक्ट प्री-कन्वेंशन’साठी सुविधा देणारी ती एकमेव महिला डीआरआर होती. २०१९-२०साली रोटरेक्ट दक्षिण एशिया – मल्टी डीस्ट्रीक्ट इन्फॉरेमेशनस् ऑफिशलची प्रशासन सचिव म्हणून नियुक्ती झाली होती.

‘अ प्राउड पॉल हेरास फेलो’ मजकुराचे सर्वात मोठे मानवी प्रतिनिधित्व करण्यासाठी गिनीज आणि लिम्का वर्ल्ड रेकॉर्डधारक आहे. आर.आय.डी.३१७०मध्ये पी.एच.एफ. सेवा देणारी पहिली डीआरआर आहे. रोटासिया जिथे २०००वर प्रतिनीधी सहभागी होतात, तो आयोजित करण्यासाठी नेतृत्व केले आहे. तसेच गोव्यात गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आयोजित करण्यासाठी हजारावर प्रतिनीधींच्या संघाचे नेतृत्व केले आहे. जून २०२० मध्ये हवाई येथे तिला प्री-कन्वेंशनसाठी बोलवण्यात आले होते. सद्या ती आर.आय.डी.साठी ‘डीस्ट्रीक्ट ब्रँड अँबसेडर’ आणि रोटरेक्ट दक्षिण एशिया – मल्टी डीस्ट्रीक्ट इन्फॉरेमेशनस् ऑफिशलसाठी सहसचिव-माहिती म्हणून कार्यरत आहे. तसेच रोटरेक्ट डीस्ट्रीक्ट ३१७० साठी ‘डीस्ट्रीक्ट ट्रेनर’चे पद सांभाळते. फ्लोरिडा येथे आर.आय. असेंबली २०२१साठी ‘रोटरॅक्ट माॅडरेटर’ म्हणून नियुक्त होणारी ती पहिली भारतीय आहे. अशा या गोमंतकीय तरुणीचा अभिमान आहे. तसेच इतर तरुणांनी तिला आदर्श मानून चालले तरी यश निश्चित मिळेल.