बायताखोल-बोरी येथील अपघातात दोघे जखमी

|
21st September 2021, 10:22 Hrs
बायताखोल-बोरी येथील अपघातात दोघे जखमी

बायताखोल - बोरी येथे अपघातग्रस्त झालेली कार आणि ट्रक.            

प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा :
बायताखोल - बोरी येथील सर्कलजवळ मंगळवारी सकाळी ट्रक आणि चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील चंदन भगत (२४, रा. झांसी) आणि अंजुम (२५) हे दोघे जखमी झाले. जखमींना उपचारार्थ बांंबोळीतील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
प्राप्त महितीनुसार, जीए-०८ व्ही-५०७७ या क्रमांकाचा ट्रक फोंड्याहून उसगावच्या दिशेने चालला होता, तर विरुद्ध बाजूने एपी-७१ बीके-१८२७ या क्रमांकाची चारचाकी उसगावहून मडगावच्या दिशेने जात होती. बायताखोल येथे अन्य एका वाहनाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. जखमींना प्रथम उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये नेऊन प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. हवालदार सिनारी पुढील तपास करत आहेत.