मडगावात चार स्टॉल्समध्ये चोरी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th July 2021, 12:44 Hrs

मडगाव : मडगाव कदंब बसस्थानकाच्या परिसरातील चार स्टॉल्समध्ये बुधवारी रात्री चोरी झाली. गुरुवारी सकाळी स्टॉल्सधारक दुकानावर आले असता दुकानात चोरी झाली असल्याचे निदर्शनास आले. या चोरीत स्टॉल्समधील दुकानदारांनी ठेवलेल्या सुट्या पैशांशिवाय जास्त काही नुकसानी झालेली नाही. चार स्टॉल्स फोडून चोरट्यांनी काही हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती स्टॉल्सधारकांनी दिली. मात्र, दुकानांच्या दरवाजे व कड्या तोडून करण्यात आलेल्या चोरीमुळे दुकानदारांत भीती निर्माण झालेली आहे.