चंद्रकांत बांदेकर यांच्या खुन्यांना त्वरित पकडा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
30th July 2021, 12:42 Hrs
चंद्रकांत बांदेकर यांच्या खुन्यांना त्वरित पकडा

पेडणे : सक्राळ - तोरसे येथील रेती व्यावसायिक चंद्रकांत बांदेकर यांचा २ जुलै रोजी दिवसाढवळ्या खून करण्यात  आला होता. या घटनेला महिना उलटण्याच्या मार्गावर आहे, मात्र अजूनपर्यंत पोलिसांनी संशयितांना अटक केली नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने पेडणे पोलीस स्टेशनवर २९ रोजी धडक देऊन पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांची भेट घेतली व संशयितांना त्वरित अटक  करून बांदेकर कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी 

केली.  यावेळी शिवसेना राज्य उपप्रमुख सुभाष केरकर यांच्यासमवेत शिवसेना महिला नेत्या ऐश्वर्या साळगावकर, राजाराम पाटील, सुशांत पावसकर, दिवाकर जाधव, विलास मळीक, राजन पार्सेकर, दीपक येरम, कृष्णा कोरगावकर, समित पवार, संजय पवार, मेहबूब नालेबन   आदी उपस्थित 

होते यावेळी निरीक्षक दळवी यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळास सांगितले की, या प्रकरणी तपास चालू आहे. मुख्य संशयिताचे रेखाचित्र प्रसारित केले आहे. संशयितांना लवकरच पकडले जाईल.