सावळवाडा - पेडणेत एकाची आत्महत्या

|
29th July 2021, 12:16 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता       

पेडणे : कृषी विभागात जुने गोवा येथे सहाय्यक कृषी कर्मचारी  म्हणून कामाला असलेले सावळवाडा - पेडणे येथील  गौरेश तेली (३३) यांनी  आपल्या घराशेजारी असलेल्या  जंगलात झाडाला दोर बांधून  गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

 याबाबत पेडणे पोलिसांना बुधवारी  सकाळी १०  वाजता माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक हरिश वायंगणकर यांनी घटनास्थळी  जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पाठविला. त्यानंतर सायंकाळी त्याच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार   करण्यात आले.

मंगळवारी सायंकाळी गौरेश हे आपल्या घरातून निघून गेले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला होता.  गौरेश यांच्या पश्चात आई, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.