Goan Varta News Ad

देशात २४ तासांत सर्वाधिक कोविडबळी

६,१४८ करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद

|
10th June 2021, 10:43 Hrs
देशात २४ तासांत सर्वाधिक कोविडबळी

नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्यापही सुरूच आहे. ही लाट ओसरत असतानाच आता पुन्हा चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासांत झालेल्या मृत्यूंची संख्या ही एका दिवसातली सर्वाधिक संख्या आहे. देशातल्या दैनंदिन बाधितांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात एका दिवसातील सर्वाधिक म्हणजे ६,१४८ करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे आता मृतांचा आकडा ३ लाख ५९ हजार ६७६ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील मृत्यूंची संख्या तीन हजारांच्या खाली आली होती. मात्र, आता झालेली वाढ चिंताजनक आहे. देशातला मृत्यूदर आता १.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे.