Goan Varta News Ad

स्वतःची, कुटुंबियांची काळजी घ्या!

वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांचे आवाहन

|
23rd April 2021, 12:42 Hrs
स्वतःची, कुटुंबियांची काळजी घ्या!

फोटो : प्रमोद सावंत
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा शनिवार, दि. २४ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांनी राज्यातील जनतेला करोना संसर्गापासून बचाव करून स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
ते आपल्या संदेशात म्हणतात, आज आपण महामारीशी युद्ध करत आहोत. वाढदिवसानिमित्त माझे आपल्याकडे इतकेच मागणे आहे, अापली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. लस घेऊन सुरक्षित राहा. आपली साथ बहुमोलाची आहे. गोव्याची सेवा करण्याची संधी मला आपणच दिली आहे. यात मला आपले सहकार्य लाभले. हे प्रेम यापुढेही कायम राहील, असा विश्वास आहे. गोव्याची संस्कृती, वारसा, गोंयकारपण पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. यासाठी आपणच मला बळ देत आहात. आजपर्यंत ज्या ऊर्जेने आपण एकत्रित राहून गोवा स्वयंपूर्ण करण्याचे स्वप्न पाहिले. आता ते सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करूया. कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे आपल्याला पालन करायचे आहे. त्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोणीही भेटण्यासाठी येऊ नका. आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी ताकत आहे.