शाळा, महाविद्यालये बंद; शिक्षकांना कामावर येण्याची सक्ती

शिक्षण, उच्च शिक्षण खात्याकडून आदेश जारी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd April 2021, 12:37 am
शाळा, महाविद्यालये बंद; शिक्षकांना कामावर येण्याची सक्ती

 पणजी : करोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा, महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. पण शिक्षक, प्राध्यापक तसेच इतर कर्मचाऱ्यांना मात्र कामावर हजर रहावे लागणार आहे. शिक्षण आणि उच्च शिक्षण खात्याने गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
करोना प्रसारामुळे ३० एप्रिलपर्यंत सर्व शाळा तसेच शैक्षणिक संस्था बंद राहतील. पण शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना दररोज कामावर यावे लागेल, अशी सूचना करणारा आदेश शिक्षण खात्याचे संचालक दिलीप भगत यांनी जारी केला आहे. तर उच्च शिक्षण खात्यानेही महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना दररोज महाविद्यालयांत उपस्थित राहून कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश जारी केले आहेत.
दरम्यान, राज्यात दररोज करोनाबाधित आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे सरकारने शिक्षक, प्राध्यापकांनाही वर्क फ्रॉम होमची संधी द्यावी. अनेक शिक्षक वयोवृद्ध आहेत. त्यांना करोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी काही शिक्षण आणि प्राध्यापकांकडून होत आहे.

हेही वाचा