पेडणेत पालिकेसाठी दिवसभरात १० अर्ज

आतापर्यंत ३८ अर्ज दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd March 2021, 10:45 pm

पेडणे : पेडणे पालिकेच्या निवडणुकीत बुधवारी दिवसभरात एकूण १० अर्ज सादर केले. उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आले . २ रोजी एकूण २८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आतापर्यंत ३८ अर्ज दाखल झाले आहेत.
प्रभाग क्रमांक १ मधून सुवर्णा नीलेश मयेकर, प्रभाग २ मधून नंदिनी शरद आपुले व दिया दत्ताराम कशाळकर, प्रभाग ५ मधून शीतल शांताराम कळंगुटकर, विशाखा विश्राम गडेकर, प्रभाग सहा मधून गीतांजली गजानन सावळ देसाई, सवी दत्ताराम सावळ देसाई‍, प्रभाग ७ मधून शिवराम तुकोजी, प्रभाग ८ मधून डॉ. साईनाथ चणेकर व प्रभाग १० मधून प्रभाकर संजय साळगावकर या दहा उमेदवारांनी अर्ज सदर केले. आज अर्ज सादर केलेल्यांमध्ये माजी नगराध्यक्ष विशाखा गडेकर व माजी नगरसेवक डॉ. साईनाथ चणेकर यांचा समावेश आहे.

हेही वाचा