फुटबॉल सब ज्युनियर नॅशनल स्पर्धा
पणजी : फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व तामिळनाडू फुटबॉल असोसिएशनतर्फे तिरुपूर तामिळनाडू येथे झालेल्या १५ वर्षांखालील मुलांच्या सब ज्युनियर नॅशनल फुटबॉल स्पर्धेत जुवेच्या श्री सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. सदर संघात श्री सरस्वती विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांचा सहभाग होता. आकाश उमेश गावस, अमोग अनिल नाईक आणि वासुदेव रोहिदास नाईक यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे १५ वर्षांखालील गोव्याच्या संघाला उपविजेतेपद प्राप्त झाले. सदर स्पर्धेत आकाश गावस याने गोव्याच्या संघाचे उपकर्णधार पद भूषविले व स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून मान मिळविला. त्यांच्या या यशाबद्दल शाळेतर्फे शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर कुबल, शाळेचे शारीरिक शिक्षक संजय तारी, शिक्षक वर्ग, पालक-शिक्षक संघ, व्यवस्थापन समिती व परिसरातून या सर्व विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.