Goan Varta News Ad

आजपासून बालसती युवा संघाची क्रिकेट स्पर्धा

|
27th February 2021, 10:12 Hrs

कुळे : सुकतली - सांगोड - मोले येथील बालसती युवा मंडळाची ११ वी आमंत्रित गटासाठी क्रिकेट स्पर्धा २८ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. स्पर्धेचा दिवशी पहिली फेरी असणार आहे. स्पर्धेची दुसरी फेरी दि. १४ मार्च रोजी असणार असून याच दिवशी स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धा देवगल सुकतलीच्या मैदानावर खेळविण्यात येणार आहे. ही स्पर्धा कुळे- शिगाव पंचायत व मोले पंचायत क्षेत्रातील खेळाडूंसाठी मर्यादीत आहे.
स्पर्धेला आकर्षक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्या संघांना १० हजार रोख व चषक, उपविजेत्या संघाला ५ हजार रोख व चषक तर उपांत्य फेरीत पराभूत संघांना प्रत्येकी २ हजार रोख तर अंतिम सामन्यातील उत्कृष्ट फलंदाजला ५०० रू. रोख, सामनावीराला ५०० रू. रोख देण्यात येणार आहेत. तसेच इतर बक्षिसे स्पर्धेवेळी देण्यात येतील.
स्पर्धेचे प्रवेश शुल्क एक हजार रुपये असणार आहे. प्रत्येक सामना ८ षटकांचा असणार आहे. एका खेळाडूला एकाच संघातून खेळता येणार असून खेळाडू ज्या पंचायत क्षेत्रात राहतो त्याच पंचायत क्षेत्रातील संघातून त्याला खेळता येईल. प्रत्येक संघाने सामना खेळण्यापूर्वी ३० मिनिटे अगोदर मैदानावर उपस्थित रहावे लागणार, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आलेले आहे.