Goan Varta News Ad

अपप्रचाराला बळी पडू नका : मुख्यमंत्री

साखळीत भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गास प्रारंभ

|
22nd November 2020, 12:45 Hrs
अपप्रचाराला बळी पडू नका : मुख्यमंत्री

फोटो : साखळीत भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. 

प्रतिनिधी । गोवन वार्ता

डिचोली : राज्यातील भाजप सरकार प्रतिकुल परिस्थितीतही समाधानकारक कामगिरी बजावत आहे. विरोधकांच्या अफवा व अप्रचाराला बळी पडू नका. आगामी सरकार हे भाजपचेच असेल. कार्यकर्ता ही पक्षाची शक्ती असून प्रत्येक घरात समृद्धी हा उद्देश यशस्वी होत आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण होत असल्यामुळे त्याचे रूपांतर पुन्हा सत्तेत होईल, असा आशावाद मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

साखळी मतदारसंघातील भाजप कार्यकर्ता दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, कालिदास गावस, यशवंत माडकर, डॉ. सरोज देसाई, सुभाष मळीक, स्वाती माईणकर व सर्व बूथ प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. म्हादईचा प्रश्न काँग्रेसनेच जटिल केला. सरकारने आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोळसा काँग्रेसनेच वाढवला, अशी टीकाही त्यांनी केली. सरकार सर्व घटकांना योग्य न्याय देण्यासाठी कटिबद्ध असून  आगामी वर्षभरात नोकरभरती व प्रकल्प यांना प्राधान्य दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गोपाळ सुर्लकर यांनी स्वागत केले. या शिबिरात दहा विषयांवर नेते मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरात सुमारे दीडशे प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. निवडणुकीतील रणनीती, प्रचाराची दिशा, सोशल मीडिया आदींबाबत  शिबिरात विस्ताराने विचारमंथन होणार आहे.