Goan Varta News Ad

खरी अष्टपैलू गायिका

4. माहीत आहे?

Story: महेश दिवेकर |
08th September 2020, 09:06 Hrs
खरी अष्टपैलू गायिका

https://www.youtube.com/watch?v=mCyU2cNXjCs

https://www.youtube.com/watch?v=Irv2cnM_63Y

https://www.youtube.com/watch?v=3WK2NMVxu_c

-

आशाने विविध शैलीतील अनेक गाणी गायिली आहेत. तशी मला गायला जमली नसती. हे उद्गार आहेत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे. त्यात तथ्यही आहे. आशा भोसले यांनी नाट्यगीत, कॅब्रे, भावगीत, गजल, मुजरा, डिस्को साऱ्या तऱ्हेची गाणी गायली आहे. हिंदी, मराठी त्यांची शेकडो गाणी आहेत. तशीच कोकणीतही आसलो एक मुनीस भुयारांत, साद तुगेला आयकूंक आयलो, चान्न्याचे रातीं... अशी अनेक गाणी गायली आहेत.

8 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस. त्यांनी 87 व्या वर्षांत पदार्पण केले आहे. (त्यांच्या भगिनी मीना यांचाही याच दिवशी वाढदिवस. पण त्या आशाताईहून दोन वर्षे वडील आहेत.) अजूनही त्यांचा आवाज पूर्वीचाच आहे, हे विशेष. आशाताईंच्या जीवनात अनेक चढउतार आले. पण, त्यातून सावरून त्या स्वतःच्या पायांवर उभ्या राहिल्या. लता मंगेशकर, गीता दत्त, नूरजहाँ यांच्यासारख्या मातब्बर गायिका आघाडीवर असताना त्यांनी आपले स्वतंत्र असे स्थान निर्माण केले हे विशेष. अशी गाणी गायली जी गाताना अनेकांना महत्प्रयास करावे लागतात.

आशाताईंची सिनेगायनाची कारकिर्द 1943 मध्ये सुरू झाली. आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली. हिंदीत ओ. पी. नय्यर आणि आशाताई ही एक अफलातून जोडी म्हणावी लागेल. काही कारणास्तव नय्यर यांनी लतादिदींकडून एकही गीत गाऊन घेतले नाही. नंतर आर. डी. बर्मन व आशाताई यांनी मिळून शेकडो हीट गाणी दिली. त्यांनी बर्मन यांच्याशी लग्नही केले. पहिले पती होते, पांडुरंग भोसले. 

आशाताईंना पद्मभूषणासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अनेक राष्ट्रीय, फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार. ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना मिळाला आहे. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. बीबीसीचा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. Asha Bhosale : A Musical Biography (इंग्रजी, राजू भारतन) हे त्यांच्यावरील एक पुस्तक. आशाताईंना शुभेच्छा.

आशा भोसले यांची काही हिंदी व मराठी गाणी- नाच रे मोरा, दिव्य स्वातंत्र्य रवी, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, सांज ये गोकुळी, मागे उभा मंगेश, ऋतू हिरवा, अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया, अरे मनमोहना, आज कुणीतरी यावे, आज प्रितीला पंख हे लाभले रे, एका तळ्यात होती, उषःकाल होता होता, किती सांगू मी सांगू कुणाला, केव्हा तरी पहाटे, चिंधी बांधते द्रौपदी... वगैरे हजारो. 

आईए मेहेरबाँ, आईये मेहरबाँ, आओ हुजुर तुमको, जाईये आप कहाँ जाएगे, उडे जब जब जुल्फे तेरी, मै प्यार का राही हूँ, दीवाना हुआ बादल, दिल चीज क्या है मेरी, कतरा कतरा बहती है, तोरा मन दर्पण कहलाए, रात अकेली है, पिया तू अब तो आ जा, दम मारो दम, दुनिया में, चुरा लिया है तुमने, मेरा कुछ सामान, परदे में रहने दो, किताबें बहुत से, तन्हा तन्हा, रंगीला रे, मुझे रंग दे, राधा कैसे न जले, झुमका गिरा रे, जानेमन जानेमन... वगैरे हजारो. 

बोनस लिंक

https://www.youtube.com/watch?v=jlO4B457aIE