Goan Varta News Ad

दोन वर्षांसाठी केला करार : कल्चरल लियोनेसचा होता कर्णधार

|
11th August 2020, 11:07 Hrs
दोन वर्षांसाठी केला करार : कल्चरल लियोनेसचा होता कर्णधार

इवान गोंजालेजसोबत एफसी गोवाचा करार
पणजी : इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) संघ एफसी गोवाने बचावपटू इवान गोंजालेजसोबत कराराची औपचारीक घोषणा केली आहे. गोंजालेजने कल्चरल लियोनेससोबत करार संपवून एफसी गोवासोबत करार केला आहे.
गोंजालेजने एफसी गोवासोबत दोन वर्षांचा करार केला आहे. याआधी गोंजालेज रियल माद्रिदचाही भाग होता. मागच्या सत्रात कल्चरल लियोनेसाचा तो कर्णधारही होता. तो मागची चार वर्षे या संघासोबत होता.
मी एक बचावपटू असलो तरी संघाला देण्यासाठी माझ्याकडे बरेच काही आहे. मी नक्कीच एक बचावपटू आहे परंतु मला चेंडूसोबत खेळून सामना संघाच्या दिशेने झुकवायला आवडते. मला वाटते यात मी उत्कृष्ट आहे, असे गोंजालेजने सांगितले.
मी याआधीही एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक जुआन फेर्रांडो यांच्यासोबत काम केले आहे व संघासोबत करार करण्यापूर्वी मी त्यांच्यासी बोललो होतो. माझे आणि क्लबचे विचार व स्वप्न जुळत असून आम्हाला एकमेकांसोबत काम करायला आवडेल, असे या बचावपटूने सांगितले.
एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कूर यांनी सां​गितले की, पुढील दोन सत्रांसाठी इवान गोंजालेजला संघात घेतले असून तो आमच्यासोबत आल्याचा आम्हाला आनंद आहे. त्याच्यासोबत आम्ही नव्या सत्राची सुरुवात करणार आहोत.
इवानचा खेळ आमच्या फुटबॉलच्या शैलीस अनुकूल आहे आणि आम्हाला खात्री आहे की तो संघात लवकरात लवकर सामील होईल. इवान एक अशी व्यक्ती होती जी आम्ही ऑफसिझनमध्ये हेरली व तो आता आमच्या संघात सहभागी झाला असून याचा आम्हाला आनंद आहे. कल्चरल लियोनेसचा तो गेली ५ वर्षे भाग होता व या संघात त्याच्या खेळात सातत्य होते. या संघात त्याने १५० सामने खेळले असून आम्ही आशा करतो की तो एफसी गोवामध्येही अशाच प्रकारे कामगिरी करत संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे पुस्कूर यांनी सांगितले. ३० वर्षीय इवान हा कल्चरल लियोनेसचा मागच्या सत्रात कर्णधार होता. या क्लबसोबत त्याने पाच वर्षे घालवली आहेत.
मी एफसी गोवामध्ये सहभागी होऊन आनंदी आहे. माझ्यासाठी ही एक चांगली संधी आहे. मागच्या काही वर्षातच या क्लबने भारतात चांगले नाव कमावले आहे. या संघात खेळून मला माझ्या कारकिर्दीत प्रगती करण्याची संधी मिळाली आहे. - इवान गोंजालेज, एफसी गोवा आघाडीपटू