१६३ कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी युवा कॉंग्रेसची भाजपविरोधात पोलिसांत तक्रार

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
१६३ कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी युवा कॉंग्रेसची भाजपविरोधात पोलिसांत तक्रार

पणजी : उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी (North Goa Collector) ३० जानेवारीला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेखाली १६३ कलम लागू केले असूनही भाजपच्या (BJP) विरोधात कारवाई का केली नाही? असा प्रश्न करीत युवा कॉंग्रेसने (Congress) पणजी पोल‌िसांत (Panji Police Station) तक्रार नोंद केली आहे. १६३ कलम केवळ चिंबल आदोलकांसाठीच कशाला; भाजप कार्यकर्त्यांविरोधात का नाही? असा प्रश्न त्यांनी केला. 

युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष अर्चीत नाईक, जनार्दन भंडारी आणि इतर कार्यकर्त्यांनी पणजी पोलिसांत जाऊन तक्रार नोंद केली. १६३ कलम पूर्ण पणजीत लागू केले होते. घोषणाबाजी, जमावबंदी असून सुद्धा भाजप कार्यकर्त्यांविरोधात कारवाई कशी झाली नाही, असा प्रश्न त्यांनी तक्रारीत केला. भाजप कार्यकर्त्यांनी त्याच दिवशी एकत्र येऊन लाऊडस्पीरवर घोषणा दिल्या. १६३ कलमाचे हे उल्लंघन ठरते. याच्या विरुद्ध पोलिसांनी कसलीच कारवाई केली नाही. १६३ कलमामुळे चिंबल ग्रामस्थांना सभा अन्य ठिकाणी घ्यावी लागली. यालाही युवा कॉंग्रेसने हरकती घेतली. 





हेही वाचा