मोरजीत बिबट्याच्या हल्ल्यात गोठ्यात बांधलेल्या वासराचा मृत्यू

पेडणे तालुक्यात रानटी प्राण्यांचा उपद्रव वाढला; पेडणे तालुक्यात रानटी प्राण्यांचा उपद्रव वाढू लागला आहे. ‘ओंकार’ हत्ती, गवे, बिबटे यांचा संचार वाढल्याने येथील स्थानिक लोकांनी त्याची धास्ती घेतली आहे. गेल्या चार दिवसांमागे गव्याच्या हल्ल्यात दोन गुरे जखमी झाली होती. त्यानंतर काल रात्री मोरजी येथे भर लोकवस्तीत गोठ्यात बांधलेल्या एका वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याचा फडशा पाडला. (Morjim leopard attack calf tied in shed dies).

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
35 mins ago
मोरजीत बिबट्याच्या हल्ल्यात गोठ्यात बांधलेल्या वासराचा मृत्यू

पेडणे : पेडणे तालुक्यात रानटी प्राण्यांचा उपद्रव वाढू लागला आहे. ‘ओंकार’ हत्ती, गवे, बिबटे यांचा संचार वाढल्याने येथील स्थानिक लोकांनी त्याची धास्ती घेतली आहे. गेल्या चार दिवसांमागे गव्याच्या हल्ल्यात दोन गुरे जखमी झाली होती. त्यानंतर काल रात्री मोरजी येथे भर लोकवस्तीत गोठ्यात बांधलेल्या एका वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याचा फडशा पाडला. (Morjim leopard attack calf tied in shed dies).  गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा संचार वाढला असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली.

मरडीवाडा, मोरजी येथे सदानंद शेटगावकर यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला ठार केले. मात्र, वासरू बांधलेले असल्याने त्याला ओढून नेणे त्याला शक्य झाले नाही. त्यामुळे गोठ्यातच त्याचा फडशा पाडला. या परिसरात अनेकांचे एकमेकाला लागूनच गुरे बांधण्यासाठी गोठे असून, बिबट्याच्या संचारामुळे गोठ्यात बांधलेल्या गुरांनी त्याची धास्ती घेतल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली.

वन खात्याने सापळा रचून या बिबट्याला जेरबंद करून न्यावे व स्थानिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

बिबट्याबरोबरच गवे आणि नागरी वस्तीत घुसून व शेतात घुसून हानी करीत असलेल्या अन्य प्राण्यांचाही बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक लोकांनी केली आहे. 

हेही वाचा
सर्व पहा