वास्को : मुरगावमधील कोळशाच्या धुळीचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत निवडून आलेले संकल्प आमोणकर (Sankalp Amonkar) यांनी भाजपमध्ये प्रवेश करून जनतेचा विश्वासघात केला आहे. भाजप आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आमोणकर यांच्या संगनमतामुळे मुरगावमध्ये कोळशाच्या धुळीचे प्रदूषण निर्माण झाले. आणि त्यातून आरोग्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh Member of Parliament, MP, Aap) यांनी केला.
कोळशाच्या धुळीचा त्रास संपविण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणाऱ्या आमोणकर यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. गोव्यातील काँग्रेसच्या अनेक नेत्यांप्रमाणेच त्यांनीही जनतेच्या हितापेक्षा स्वतःच्या फायद्याला प्राधान्य दिले, अशी टीका सिंह यांनी केली.
यावेळी आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि महिला विभागाच्या अध्यक्ष ममता नाईक माबेन आणि उपस्थित होते. मुरगावमधील कोळसा प्रदूषणाच्या प्रश्नावरून आप नेत्यांनी भाजप आणि संकल्प आमोणकर यांना लक्ष्य केले.


