बार्देश तालुक्यात ११ वर्षांच्या मुलाकडून बालिकेवर लैंगिक अत्याचार

बार्देश तालुक्यातील किनारी भागात लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या ५ वर्षांच्या चिमुरडीवर ११ वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
19th November, 10:35 am
बार्देश तालुक्यात ११ वर्षांच्या मुलाकडून बालिकेवर लैंगिक अत्याचार

म्हापसा : बार्देश तालुक्यातील (Bardez Taluka)  किनारी भागात लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या ५ वर्षांच्या चिमुरडीवर ११  वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Goa Police)  मुलाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

मुलीने आपल्या आईला यासंदर्भात माहिती दिल्यावर त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. त्यानंतर वैद्यकीय चाचणीत मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून आले. लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागलेली बालिका कामगार वर्गातील आहे. तिचे आईवडील मुलीला घरी ठेवून कामाला गेले होते. त्याची संधी साधून या मुलाने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मुलाने बालिकेला अनेक वेळा मारहाण केल्याचेही तपासात पुढे आले आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

दरम्यान, गेल्या १५ दिवसांत राज्यात लहान मुलांवर घडलेली अत्याचाराची ही चौथी घटना आहे. म्हापसा येथे एका चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर काणकोण येथेही अशीच घटना घडली होती. या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी संशयित आराेपींना अटक केली आहे. एकूण या घटनांमुळे बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

हेही वाचा
सर्व पहा