काणकोणमध्ये चोरीच्या घटना वाढल्या

तेंबेवाडा-पाळोळे येथे हॉस्टेलमध्ये चोरी; तेंबेवाडा-पाळोळे येथील एका हॉस्टेलमध्ये राहणारे रवी कुरूबार यांची ज्युपिटर दुचाकी, एचपी लॅपटॉप, १६ इंची मॅकबुक, पासपोर्ट, ८ हजार रुपये रोख तसेच ३ हजार इस्त्रायली शेकेल आणि १ हजार अमेरिकन डॉलर्स असा मोठा ऐवज चोरीला गेला.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
16th November, 05:30 pm
काणकोणमध्ये चोरीच्या घटना वाढल्या

पैंगीण : तेंबेवाडा-पाळोळे येथील एका हॉस्टेलमध्ये राहणारे रवी कुरूबार यांची ज्युपिटर दुचाकी, एचपी लॅपटॉप, १६ इंची मॅकबुक, पासपोर्ट, ८ हजार रुपये रोख तसेच ३ हजार इस्त्रायली शेकेल आणि १ हजार अमेरिकन डॉलर्स असा मोठा ऐवज चोरीला गेला. काणकोण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक बाबू देसाई पुढील तपास करत आहेत.

ऑक्टोबरच्या उत्तरार्धात चोरांनी चावडी जुन्या बस स्थानकाजवळील 'मंगेश हॉटेल' आणि 'निलेश खानावळ' यांचे छप्पर कापून आत प्रवेश केला व सुमारे ९ ते १० हजार रुपयांची रोकड लंपास केली.

चावडी बाजारपेठेतील दुकानांतून किराणा माल, नारळ आणि रोख रक्कम सातत्याने चोरीला जात असल्याने व्यापारी हैराण आहेत. पोलिसांनी याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पणसुलेत १५ लाखांचा ऐवज चोरीला

पणसुले सारख्या भागात बंद घरे लक्ष्य करून चोरांनी १.९० लाख ते १५ लाख रुपयांपर्यंतचे सोन्याचे दागिने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू लांबवल्या आहेत.परिसरात राहणाऱ्या भाडेकरू आणि स्थलांतरित कामगारांपैकी सुमारे ५० टक्के लोकांची अधिकृत नोंदणी नसल्याचे स्थानिक आणि लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी तसेच सर्व भाडेकरू, घरकामगार आणि केअरटेकर यांची पोलीस पडताळणी (व्हेरिफिकेशन) सक्तीची करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा