कुर्टीत होणार आयसीयू सुविधा असलेले पशूवैद्यकीय हॉस्पिटल

पशूवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी ५३ कोटी; : कुर्टी येथे पशूवैद्यकीय आणि पशूविज्ञान महाविद्यालयाजवळ सूसज्ज असे पशूवैद्यकीय हॉस्पिटल उभारण्यात येईल. या हॉस्पिटलमध्ये आयसीयू बरोबर इतर अत्याधुनिक उपचार करणाऱ्या सेवा उपलब्ध होतील.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
16th November, 03:55 pm
कुर्टीत होणार आयसीयू सुविधा असलेले पशूवैद्यकीय हॉस्पिटल

पणजी : कुर्टी येथे पशूवैद्यकीय आणि पशूविज्ञान महाविद्यालयाजवळ सूसज्ज असे पशूवैद्यकीय हॉस्पिटल उभारण्यात येईल. या हॉस्पिटलमध्ये आयसीयू बरोबर इतर अत्याधुनिक उपचार करणाऱ्या सेवा उपलब्ध होतील. तसेच महाविद्यालयाच्या अद्ययावत इमारतीसाठी ५३ कोटी रूपयांची तरतूद असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी सांगितले.

कुर्टी येथील पशूवैद्यकीय आणि पशूविज्ञान महाविद्यालयात पहिल्या वर्षाच्या वर्गांना सुरूवात झाली. यावेळी ओरिएंटेशन (परिचय) कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बीव्हीएस्सीअँडएएच या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मंत्री नीळकंठ हळर्णकर, मुख्य सचिव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कोडार येथे पाळीव पशूंसाठी २५ एकर जमिनीची व्यवस्था करण्यात आली आहे.

 गेल्या १५ वर्षांत गोव्यात अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि बळकटीकरण झाले आहे, ज्यामुळे आपल्या तरुणांसाठी विविध संधी निर्माण झाल्या आहेत. त्यांनी नमूद केले की, या महाविद्यालयाची सुरुवात आणि मत्स्यव्यवसाय महाविद्यालयाची स्थापना, हे राज्यातील व्यावसायिक शिक्षण अधिक बळकट करण्याच्या दिशेने उचललेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

या संस्थेच्या उभारणीसाठी समर्पित प्रयत्न करणाऱ्या अधिकारी आणि संबंधित सर्वांचे अभिनंदन केले व त्यांचा सत्कार केला. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांची ही पहिली तुकडी या प्रवासाची प्रणेती ठरेल. मला खात्री आहे की, हे संकुल केवळ गोव्यातीलच नव्हे, तर देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संकुलांपैकी एक म्हणून नावारूपाला येईल.

क्षेत्रात प्रचंड संधी

पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत. यामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून काम करण्यासोबतच संबंधित क्षेत्रांतील व्यावसायिक संधींचाही समावेश होतो. त्यांनी विद्यार्थ्यांना या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचे आणि गोव्याच्या कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेत योगदान देण्याचे आवाहन केले.

हेही वाचा
सर्व पहा