महिला, बालकांवरील गुन्ह्यांच्या तपासासाठी दोन पोलीस स्थानके अधिसूचित

उत्तर गोव्यासाठी पणजी तर दक्षिण गोवा, कुशावतीसाठी मडगाव; राज्यात महिला व बालकांशी संबंधित गुन्ह्यांच्या तपासासाठी उत्तर गोव्यातील (North Goa) पणजी आणि दक्षिण गोवा (South Goa) व कुशावती जिल्ह्यांसाठी मडगाव येथील महिला पोलीस स्थानकांना अधिकृतपणे अधिसूचित केले आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
16th November, 03:03 pm
महिला, बालकांवरील गुन्ह्यांच्या तपासासाठी दोन पोलीस स्थानके अधिसूचित

पणजी : महिला आणि बालकांवरील वाढत्या गुन्ह्यांच्या तपासाला अधिक प्रभावी दिशा देण्यासाठी गोवा सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात महिला व बालकांशी संबंधित गुन्ह्यांच्या तपासासाठी उत्तर गोव्यातील (North Goa)  पणजी आणि दक्षिण गोवा (South Goa) व कुशावती जिल्ह्यांसाठी मडगाव येथील महिला पोलीस स्थानकांना अधिकृतपणे अधिसूचित केले आहे.

या निर्णयामुळे महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या प्रकरणांचा तपास विशेष महिला पोलीस स्थानकांमार्फत केला जाणार आहे. यामध्ये बलात्कार, हुंडाबळी, लैंगिक छळ, बालकांचे लैंगिक शोषण, बालविवाह आणि बालमजुरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

या गुन्ह्यांचा तपास संबंधित महिला पोलीस स्थानकांमार्फत करण्यात येणार असल्याने अशा प्रकरणांच्या तपास प्रक्रियेला अधिक विशेष लक्ष आणि गती मिळण्याची अपेक्षा आहे. महिला व बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.


हेही वाचा
सर्व पहा