संशयित पुंडलिक गुडगेला चार दिवसांची पोलीस कोठडी

चार वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरण

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
5 hours ago
संशयित पुंडलिक गुडगेला चार दिवसांची पोलीस कोठडी

म्हापसा : चार वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी अटक केलेल्या पुंडलिक गुडगे (२८, ह्याबळ्ळी, धारवाड, कर्नाटक) याला मेरशी येथील पॉक्सो न्यायालयाने आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी त्याला पाच दिवसांची कोठडी देण्यात आली होती.
संशयिताची पोलीस कोठडी संपत असल्याने सोमवारी त्याला पोलिसांनी पॉक्सो न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने ही अतिरीक्त पोलीस कोठडी सुनावली आहे. दिवाळीच्या रात्री, ८ नोव्हेंबर रोजी म्हापसा येथील एका जीर्ण इमारतीत हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. संशयिताने बालिकेला फूस लावून तिचे अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी ११ नोव्हेंबर रोजी पणजी कदंब बसस्थानकावरून त्याला अटक केली होती. पोलीस निरीक्षक अनंत गावकर पुढील तपास करीत आहेत.
कौटुंबिक पार्श्वभूमीची चौकशी
तपासादरम्यान पोलिसांनी संशयिताच्या मूळ गावी जाऊन त्याची गुन्हेगारी आणि कौटुंबिक पार्श्वभूमी तपासली. त्याच्याविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे समोर आले आहे. संशयित विवाहित असून, कौटुंबिक वादामुळे त्याची पत्नी तीन वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली आहे. त्याचा लहान मुलगा आईसोबत राहतो. संशयिताचे आई-वडील हयात नसून, त्याचा भाऊ कुटुंबासह मूळ घरी राहतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.      

हेही वाचा
सर्व पहा