गावडोंगरी, काणकोण येथे माडावरून पडून एकाचा मृत्यू

: कर्वे-गावडोंगरी, काणकोण येथे नारळ काढण्यासाठी माडावर गेलेल्या दिवाकर वेळीप (वय ५७) यांचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
49 mins ago
गावडोंगरी, काणकोण येथे माडावरून पडून एकाचा मृत्यू

काणकोण : कर्वे-गावडोंगरी, काणकोण येथे नारळ काढण्यासाठी माडावर गेलेल्या दिवाकर वेळीप (वय ५७) यांचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला.

काणकोण पोलिसांनी (Canacona Police) दिलेल्या माहितीनुसार, दिवाकर वेळीप नेहमीप्रमाणे कर्वे येथे नारळ काढण्यासाठी माडावर चढले होते. अचानक पाय घसरला व ते खाली पडले. उंचावरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, ड्युटीवरील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी काणकोण पोलीस (Goa Police) स्थानकाचे उपनिरीक्षक बाबू देसाई अधिक तपास करीत आहेत.