पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गोवा पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’; बाऊन्सर्सच्या वर्तनावर पोलिसांची नजर

हॉटेल, क्लब मालकांना कडक सूचना; गोव्यात पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, तसेच किनारपट्टीवरील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी गोवा पोलिसांनी कंबर कसली आहे. (Goa Police today held a meeting with tourism stakeholders, including hotel, restaurant and club owners from the coastal belt).

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गोवा पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’; बाऊन्सर्सच्या वर्तनावर पोलिसांची नजर

पणजी : गोव्यात पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, तसेच किनारपट्टीवरील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी गोवा पोलिसांनी कंबर कसली आहे. (Goa Police today held a meeting with tourism stakeholders, including hotel, restaurant and club owners from the coastal belt).

 या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी ३० ऑक्टोबर रोजी हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लब मालकांसह पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनासाठी पोलीस यंत्रणा व हॉस्पिटॅलिटी उद्योग यांच्यात समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीला पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, वाहतूक पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, किनारपट्टीवरील पोलीस स्थानकांचे निरीक्षक आणि वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते. पर्यटन खात्याचे अधिकारी तसेच गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधीही बैठकीत सहभागी झाले.

बैठकीत हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबच्या ठिकाणी सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक आस्थापनात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे ठेवणे तसेच अग्निसुरक्षेच्या उपाययोजना सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी आणि विशेषतः बाऊन्सर्सनी पर्यटकांशी सौजन्यपूर्ण वर्तन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.

कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर हालचाल निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. ध्वनीप्रदूषणाच्या निर्धारित मर्यादांचे पालन करणे, पर्यटकांच्या वाहतुकीचे नियोजन आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास स्थानिक पोलीस व वाहतूक पोलिसांना सहकार्य करणे, यावरही विशेष भर देण्यात आला.

सायबर फसवणुकीबाबत सतर्कतेचा इशारा

दरम्यान, हॉटेल बुकिंगच्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीबाबतही पोलिसांनी पर्यटन व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा दिला. पर्यटकांची सुरक्षितता, शांततापूर्ण वातावरण आणि गोव्याची पर्यटन क्षेत्रातील प्रतिमा जपण्यासाठी सर्व संबंधितांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

हेही वाचा
सर्व पहा