पासपोर्ट सेवा केंद्र २ नोव्हेंबरपासून नव्या जागेत स्थलांतर‌ित

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आहे तेथेच; पाटो, पणजी येथे असलेले पासपोर्ट सेवा केंद्र (Passport Seva) नव्या जागेत स्थलां‌तरित करण्यात येत आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
पासपोर्ट सेवा केंद्र २ नोव्हेंबरपासून नव्या जागेत स्थलांतर‌ित

पणजी : पाटो, पणजी येथे असलेले पासपोर्ट सेवा केंद्र (Passport Seva) नव्या जागेत स्थलां‌तरित करण्यात येत आहे. २ नोव्हेंबरपासून नव्या जागेत कार्यालयीन कामकाज सुरू करण्यात येणार आहेत. प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय सध्या आहे तेथेच राहणार आहे.
सध्या पासपोर्ट भवन, १३-ए, ईडीसी कॉम्प्लेक्स, पाटो प्लाझा, पणजी  येथे कार्यरत आहे.  ते सोमवार, दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ पासून रॉयल सिटी ऑफ जॉय, ऑडिट भवन जवळ, पिळर्ण, बार्देश येथे नवीन जागेत स्थलांतरित करण्यात येणार आहे.
पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि जनतेला पुरविल्या जाणाऱ्या पासपोर्ट सेवांचा दर्जा उंचावण्याच्या उद्देशाने  पीएसके (PSK) कार्यालय स्वतंत्र जागेत स्थलांतर केले जात आहे.
ज्या सर्व अर्जदारांच्या भेटीची वेळ (Appointments) २ नोव्हेंबर २०२६ किंवा त्यानंतर सध्याच्या पीएसके पणजी येथे निश्चित केलेली आहे.  त्यांनी त्यांच्या अर्ज पावतीवर (Application Receipt) नमूद केलेल्या निश्चित तारखेला आणि वेळेत रॉयल सिटी ऑफ जॉय, ऑडिट भवन जवळ, पिळर्ण, बार्देश येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा
सर्व पहा