अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल

दक्षिण गोव्यातील एका अल्पवयीन मुलीवर गुन्हा शाखेत लैंगिक शोषण करण्यात आले होते. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विकास दयेकर यांच्यासह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


3 hours ago
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
दक्षिण गोव्यातील एका अल्पवयीन मुलीवर गुन्हा शाखेत लैंगिक शोषण करण्यात आले होते. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विकास दयेकर यांच्यासह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी दयेकर यांना नोटीस बजावून चौकशीसाठी पाचारण केले आहे.
जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मुरगाव तालुक्यातील १६ वर्षीय मुलीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विकास दयेकर याच्याकडे तीन वर्षापूर्वी एका विभागाचा ताबा होता. त्यावेळी पीडित मुलीची एका प्रकरणात संशयित महिलेने विकास दयेकर याची ओळख करून दिली होती. त्यावेळी दयेकर याने पीडित मुलीची मदत केली होती. त्यामुळे पीडित मुलीची आणि निरीक्षक दयेकर यांची ओळख झाली होती. ओळखीचा गैरफायदा घेऊन निरीक्षक दयेकर याने अनेकदा तिला त्याच्या गुन्हा शाखेच्या कार्यालयात बोलावून घेतले होते. याच दरम्यान २५ जुलै आणि २७ ऑक्टोबर रोजी विकास दयेकर याने तिचे लैंगिक शोषण केल्याचे म्हटले आहे.
दयेकरला चौकशीसाठी आज पाचारण
दरम्यान, या तक्रारीची दखल घेऊन जुने गोवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विकास दयेकर आणि एका महिलेलच्या विरोधात भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ (पाेक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याच दरम्यान जुने गोवा पोलिसांनी निरीक्षक दयेकरला नोटीस बजावून चौकशीसाठी शनिवारी पाचारण केले आहे.      

हेही वाचा
सर्व पहा