तेंबेवाडा-काणकोण येथे आग लागून घर भस्मसात

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
3 hours ago
तेंबेवाडा-काणकोण येथे आग लागून घर भस्मसात

काणकोण : तेंबेवाडा काणकोण येथे लक्ष्मी कोमरपंत या वृद्धेच्या घराला आग लागून घर पूर्णत: भस्मसात झाले. गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

आगीत घरातील कपाट, फ्रिज व इतर विजेवर चालणाऱ्या वस्तू खाक झाल्या. घरात झोपलेल्या लक्ष्मी कोमरपंत यांना आग लागल्याचे समजताच तिने आरडाओरड केली. स्थानिक नागरिकांनी आगीवर पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अथक परिश्रमानंतर अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. शुक्रवारी सकाळी काणकोणचे आमदार तथा मंत्री रमेश तवडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली व श्रमधाम योजने अंतर्गत नवे घर बांधून देण्याचे आश्वासन लक्ष्मी कोमरपंत यांना दिले. यावेळी भाजपच्या काणकोण महिला मोर्चा अध्यक्ष नीतू देसाई, कुशवंत भगत, महेश नाईक, विनय तुबकी, विशाल देसाई, सिद्धार्थ देसाई, पोलीस निरीक्षक तेर्रान डिकॉस्टा व इतर उपस्थित होते. घराला आग कशी लागली याचे कारण समजू शकले नाही. मात्र, आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

हेही वाचा
सर्व पहा