धारजोवाडा-कुंडई येथे घराला आग; दीड लाख रुपयांचे नुकसान

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
3 hours ago
धारजोवाडा-कुंडई येथे घराला आग; दीड लाख रुपयांचे नुकसान

फोंडा : धारजोवाडा-कुंडई येथील कुंदा वासुदेव नाईक यांच्या घराला शुक्रवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय असून अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कुंडई अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन आग विझविली.

कुंदा नाईक यांच्या घराला संध्याकाळी अचानक आग लागली. आग लागल्याने त्वरित कुंडई अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. आगीत घरातील वीजेवर चालणारी उपकरणे, टेबल, खुर्च्या, स्वयंपाक घरातील भांडी व अन्य साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर माधवराव ढवळीकर ट्रस्टचे मिथिल ढवळीकर, सरपंच सर्वेश गावडे, समाजसेवक मिथुन वैद्य, महेंद्र कुंडईकर व कालिंदी नाईक यांनी आग लागलेल्या घराची पाहणी केली. यावेळी मिथिल ढवळीकर यांनी कुंदा नाईक यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. 

हेही वाचा
सर्व पहा