आरजीपी मनोजची की वीरेशची? चर्चा पुन्हा रंगली

रेव्ह्युलेशनरी गोवन्स पक्ष (Revolutionary Goans Party RGP) कुणाचा वीरेश बोरकर (Viresh Borkar) की मनोज परब (Manoj Parab) यांचा या विषयी पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
4 hours ago
आरजीपी मनोजची की वीरेशची? चर्चा पुन्हा रंगली

पणजीः रेव्ह्युलेशनरी गोवन्स पक्ष (Revolutionary Goans Party RGP)  कुणाचा वीरेश बोरकर (Viresh Borkar) की मनोज परब (Manoj Parab) यांचा या विषयी पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे.

दक्षिण गोव्यात मतदार यादीच्या खास पुनरनिरीक्षणाच्या बैठकीत मनोज परब गटाचे सदस्य सहभागी झाले होते. अशीच बैठक उत्तर गोव्यात सुद्धा झाली होती. त्यातही परब गटाचे सदस्य उपस्थित होते. काही तांत्रिक त्रुटींमुळे परब गटाचे सदस्य या बैठकीत पोहोचले. आणि ही त्रुटी दूर केल्याचे वीरेश बोरकर यांनी सांगितले होते. 

हल्लीच काही दिवसांपूर्वी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अशीच एक बैठक घेतली होती. या बैठकीत परब गटाचे आरजीपीचे उत्तर गोव्याचे खनिजनदार उपस्थित होते. या बैठकीमुळे आरजीपीतील अंतर्गत वादासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 

त्यानंतर वीरेश बोरकर आणि आरजीपीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची भेट घेऊन या विषयी स्पष्टीकरण मागितले. निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात पक्षाचे पुर्वीचे इमेल, पत्ता सर्व बदलले आणि नवे तपशील टाकले आहेत.

परब गटाच्या सदस्यांची उपस्थिती बेकायदेशीर आहे आणि हे सदस्य पक्षाकडे संबंधित नाहीत. तसेच दक्षिण गोव्यातील बैठकीसाठी पक्षाकडे नोंद असलेल्या सदस्यांची यादी दिल्याचे बोरकर यांनी सांगितले.

पण दक्षिण गोवा मतदार यादीत खास पुनरनिरीक्षणाच्या बैठकीत वेगळेच घडले. दक्षिण गोवा जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांच्या अध्यक्षेतखाली आयोजित केलेल्या बैठकीत परब गटाच्या आरजीपीचे उपाध्यक्ष सेबेस्त्यांव फर्नांडिस सहभागी झाल्याचे अजय खोलकर यांनी सांगितले.

बैठकीत खास संक्षिप्त पुनरनिरीक्षणाचे वेळपात्रक आणि प्रक्रिया, बूथ स्तरावरील प्रतिनिधींची निवड आणि त्यांची जबाबदारी, मसुदा मतदार यादीची पडताळणी, दावे आणि हरकती सादर करण्याची प्रक्रिया तसेच मतदार जागृतीसाठी खास शिबिरे आयोजित करणे या विषयावर चर्चा झाली.

हेही वाचा
सर्व पहा