म्हादईच्या पाण्याचा तंटा सोडवण्यासाठी हवे प्रभावी व्यवस्थापन : जी.सी. तल्लूर, कर्नाटक

गोव्याचे हित जपणे गरजेचे : म्हादई बचाव कार्यकर्त्यांची मागणी; म्हादई आणि मलप्रभा नदीच्या पाणी वाटपाचा प्रश्न (mahadayi and malaprabha river water dispute) सोडवण्यासाठी पाण्याचा काटेकोर वापर आणि प्रभावी व्यवस्थापन अत्यंत आवश्यक असल्याचे मत कर्नाटकाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) माजी सचिव जी. सी. तल्लूर यांनी व्यक्त केले.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
40 mins ago
म्हादईच्या पाण्याचा तंटा सोडवण्यासाठी हवे प्रभावी व्यवस्थापन : जी.सी. तल्लूर, कर्नाटक

पणजी : म्हादई आणि मलप्रभा नदीच्या पाणी वाटपाचा प्रश्न (mahadayi and malaprabha river water dispute) सोडवण्यासाठी पाण्याचा काटेकोर वापर आणि प्रभावी व्यवस्थापन अत्यंत आवश्यक असल्याचे मत कर्नाटकाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) माजी सचिव जी. सी. तल्लूर यांनी व्यक्त केले.

म्हादई आणि मलप्रभा नदीच्या पाणी वाटपाच्या प्रश्नावर गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतील शेतकरी आणि या प्रश्नावर आवाज उठवणारे कार्यकर्ते यांचे एक आंतरराज्य चर्चासत्र आयोजित केले होते. त्यातून म्हादई पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या चर्चासत्रात माहिती देताना जी. सी. तल्लूर यांनी वरील मत व्यक्त केले.

नद्यांच्या पाण्याचा वापर करताना प्रत्येक राज्याने जबाबदारीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे, असे तल्लूर यांनी स्पष्ट केले. पाण्याचे योग्य नियोजन आणि काटेकोर व्यवस्थापन केल्यास नदीच्या पाणीवाटपाशी संबंधित वाद सोडवण्यास मदत होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

गोव्याचे हित जपणे गरजेचे

दरम्यान, म्हादई नदीचे पाणी गोव्याच्या (Goa) दृष्टीने महत्त्वाचे असून, या पाण्यावर राज्यातील अनेक भागांचे नैसर्गिक पर्यावरण आणि जलस्त्रोत अवलंबून आहेत. त्यामुळे म्हादई पाण्याचा विषय हाताळताना गोव्याच्या हिताचे संरक्षण होणे गरजेचे असल्याचे गोव्यातील शेतकरी, पर्यावरण व म्हादई बचाव मोहीमेतील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.


हेही वाचा
सर्व पहा