स्पर्धा परीक्षा – चालू घडामोडी

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी चालू घडामोडींचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांची माहिती योग्य पद्धतीने संकलित आणि लक्षात कशी ठेवावी, जाणून घेऊया.

Story: यशस्वी भव: |
07th November, 09:13 pm
स्पर्धा परीक्षा – चालू घडामोडी

कोणत्याही स्पर्धा परीक्षा असल्या तरी परीक्षेमध्ये हमखास असणारे प्रश्न म्हणजे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, आर्किटेक्चर, शिक्षक अशा परीक्षांबरोबरच इतर परीक्षांमध्येही यावर प्रश्न विचारले जातात. यूपीएससी, बँकिंग, रेल्वे, पोलीस या सारख्या परीक्षांमध्ये यावर प्रश्न असतात.

चालू घडामोडी यांचा अभ्यास कितीही केला तरी तो पुरेसा नसतो. कारण दर सेकंदाला जगात काही ना काही घडतच असते. मग लक्षात तरी काय काय ठेवणार? यामुळेच याचा अभ्यास करणे कठीण असते.

चालू याचा अर्थ साधारणपणे चालू असलेल्या दिवसांपासून एक ते दीड वर्ष मागे त्या घटना घडल्या असतील, त्यालाच चालू घडामोडी अर्थात करंट अफेअर्स असे म्हणतात. रोज कोणतेही वर्तमानपत्र उघडले की देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आधारित २० तरी नवीन बातम्या दिसतात. आता साधारणपणे मागील ५०० दिवसांमधील अशा बातम्या लक्षात ठेवायच्या म्हणजे एक प्रकारची कसरतच आहे. परंतु यालाच मार्ग काढायचा असतो.

शहरातील ज्या लोकल बातम्या यात येतात त्या या विषयातून वगळल्या जातात. ज्या फार महत्त्वाच्या बातम्या असतात त्यांचा अभ्यास करणे इष्ट राहील. राज्यपातळीवरील तसेच देशपातळीवरील बातम्या महत्त्वाच्या ठरतात. यामुळे अभ्यास करताना ‘फिल्टर’ लावतील. एक स्वतंत्र नोटबुक यासाठी करावी व त्यात स्वतःच्या हाताने या घटना त्यात लिहिल्या जातील. लिखिते की जास्त लक्षात राहते. या तत्त्वाने या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा.

शहर, राज्य, देश, आंतरराष्ट्रीय असे चार विभाग करावेत. अशा अशा बातम्या असतील त्या प्रमाणे त्या त्या विभागात नोंद करत जावे. शक्यतो ८०० पाने वही करावी. प्रत्येक विभागाला साधारणपणे ३० ते १०० पाने यांची विभागणी करावी.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांसाठी जास्त पाने ठेवावीत. राष्ट्रीय संस्था आणि त्यांचे अध्यक्ष/सेक्रेटरी यांचे वेगळे कोष्टक करावे. तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांचे पण नमूद करावे. यामध्ये संस्थेचे नाव जर बदलले असेल तर बदललेले नाव, किती साली सुरू झाली ती तारीख व सनावळ, माजी अध्यक्ष/प्रमुख व आजी पदाधिकारी यांची नावे लिहिती. यामध्ये रिझर्व्ह बँक, इंटरनॅशनल कमिशन, स्टेट बँक ऑफ इंडिया, रेल्वे मंत्रालय, आधार केंद्र, भाषा ऑथॉरिटी, रिझर्व्ह बँक, आशिया पॅसिफिक मंत्रालय, प्लॅनिंग कमिशन, नीती आयोग, आयकर विभाग, लिफ्ट अॅथॉरिटी, लॉ कमिशन, सुप्रीम कोर्ट, विविध हायकोर्ट, इंडियन बार कौन्सिल, ऑर्गनायझेशन जनरल, भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण प्राप्त महोदय, बजेट विभाग, वित्त विभाग, संरक्षण दलाचे प्रमुख, सीबीआय, इन्कम टॅक्स इत्यादी पदाधिकाऱ्यांची नोंद करावी.

एका कोष्टकामध्ये शासकीय जुन्या योजना, नव्या योजना, त्यांची नावे, त्यांचे हेतू, कार्यान्वित होण्याचे साल, त्यांचे धोरण, प्रमुख योजना समावेश करावा. राज्य योजना आणि केंद्राच्या योजना या वेगवेगळ्या लिहाव्यात. शासकीय स्तरावर निराधार महिला, मागासवर्गीय, शोषित, पीडितांसाठी, महिला व बालकल्याण, वंचितांसाठी, अपंग कामगारांसाठी अनेक शासकीय योजना असतात. त्यांची माहिती घ्यावी. व्यवस्थितपणे लिहावी.

मागील वर्षात जे काही नवीन कायदे करण्यात आले, त्यांची माहिती, कायद्याचे नाव, वर्ष, हेतू यांची नोंद करावी. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सात खंडांच्या पद्धतीने त्या त्या देशातील घडामोडी त्याच्या खंडाच्या विभागात लिहाव्यात.

राष्ट्रप्रमुख – पक्षप्रमुख यांची नियुक्ती, कार्यकाळ नमूद करावा. आंतरराष्ट्रीय संस्थांची वेगळी यादी करावी. त्यांचे प्रमुख, त्यांची कार्ये, उद्दिष्टे, आजी-माजी अध्यक्ष यांची नावे लिहावीत.