पाकातली चिरोटी (दिवाळी विशेष)

आज दिवाळी आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळाचा बेत असतो. त्यात पाच वेगवेगळे पदार्थ असतात. तसाच काहीसा हा एक पदार्थ आहे पाकातली चिरोटी

Story: चमचमीत रविवार |
07th November, 09:38 pm
पाकातली चिरोटी  (दिवाळी विशेष)

साहित्य

२ वाट्या मैदा

२ चमचे रवा

२ चमचे तूप

चिमूटभर मीठ

आवश्यकतेनुसार दूध किंवा पाणी

तांदळाचे पीठ ३ चमचे

३ चमचे तूप (साटा तयार करण्यासाठी)

१ वाटी साखर 

अर्धी वाटी पाणी

वेलची पूड

केशराचे काही धागे

आवडीनुसार ड्राय फ्रुटस बारीक चिरलेले 


कृती

सर्वप्रथम एका परातीत मैदा, रवा, मीठ आणि तूप घालून चांगले एकत्र करून घ्यावे. त्यामध्ये थोडे थोडे दूध किंवा पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यावे. पीठ झाकून २० मिनिटे बाजूला ठेवावे.आता एका वाटीत तूप आणि तांदळाचे पीठ एकत्र करून साटा तयार करावा.

मळलेल्या पिठाच्या पाच ते सहा पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात. प्रत्येक पोळीला साट्याचे मिश्रण लावून एकावर एक ठेवावे. त्याची घट्ट गुंडाळी करून लहान तुकडे कापावेत. प्रत्येक तुकडा हलक्या हाताने लाटून घ्यावा. कढईत तेल किंवा तूप गरम करून चिरोट्या मंद आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्याव्यात.

एका भांड्यात साखर आणि पाणी घालून एकतारी पाक तयार करावा. त्यात वेलची पूड, ड्राय फ्रुटस आणि केशर घालावे. तयार पाकात गरमागरम चिरोट्या पाखात घालून अर्धा ते एक तास बाजूला ठेवावे. तर काय मंडळी आवडली ना रेसिपी..! नक्की करून बघा आणि तुमच्या गोड कुटुंबाना नक्कीच करून घाला.


संचिता केळकर