म्हापसा पालिकेला ‘डे नुलम एक्सलन्स’ पुरस्कार


25th April 2018, 03:38 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : म्हापसा नगरपालिकेने गोवा राज्य नागरी एजन्सीच्या सहाय्याने गेले वर्षभर चालविलेल्या गोवा राज्य नागरी स्वयंरोजगार प्रशिक्षण अभियानात ४०० लाभार्थी महिलांना यशस्वी प्रशिक्षण दिल्याबद्दल म्हापसा नगरपालिकेला ‘डे नुलम एक्सलन्स अवार्ड’ बहाल करण्यात आला. राज्यातून म्हापसा पालिका मंडळाला हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
वर्षभर चालू असलेल्या स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळेत पाककला, फॅशन डिझाईनिंग, शिलाई व ब्युवटिशियन या विषयांचे प्रशिक्षण तज्ज्ञांकडून देण्यात आले. शिवाय पालिका क्षेत्रातील एकूण ४७ स्वयंसहाय्य गटांची नोंदणी करून एकाला स्वतःच्या पायावर उभे करून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालिकेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. दोन्ही पुरस्कार पालिका संचालनालयाच्या संचालिका तथा अभियानाच्या संचालिका आर. रेणोका यांनी हे पुरस्कार पालिका मंडळाला प्रदान केले आहेत.

पालिकेला मिळालेल्या पुरस्कारामुळे आम्हाला अत्यानंद झाला असून पुढील वर्षी या पेक्षाही चांगली कामगिरी करून जास्तीत जास्त लोकांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास यशस्वी करण्यात येईल. - क्लेन मादेरा, पालिका मुख्याधिकारी  

हेही वाचा