पार्सेत काँग्रेसचा घरोघरी प्रचार; मतदारांत उत्साह

अॅड. रमाकांत खलप यांना निवडून देण्याचे आवाहन‍

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
28th April, 12:18 am
पार्सेत काँग्रेसचा घरोघरी प्रचार; मतदारांत उत्साह

पार्से येथे इंडी आघाडीतर्फे निवडणूक प्रचार करताना गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर, काँग्रेस नारायण रेडकर, आपचे देवेंद्र प्रभुदेसाई, गोवा प्रदेश काँग्रेस माजी चिटणीस प्रमेश मयेकर व इतर.

हरमल : लोकसभा निवडणुकीतील इंडी आघाडीचे काँग्रेस उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांचा पार्सेतून घरोघरी प्रचार प्रारंभ केला आहे. यावेळी मतदारांत उत्साह असून या खेपेला इंडीच्या उमेदवारास निवडून देणार असल्याचे मतदारांनी सांगितले.
या प्रचारात गोवा फॉरवर्डचे नेते तथा माजी जीप सदस्य दीपक कळंगुटकर, मांद्रे काँग्रेस गटाचे अध्यक्ष तथा निमंत्रक नारायण रेडकर, मांद्रे युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय नाईक, गोवा प्रदेश काँग्रेस माजी चिटणीस प्रमेश मयेकर, आपचे देवेंद्र प्रभुदेसाई, गुरू पांडे, मिगेल फर्नांडिस आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या निवडणुकीत इंडीच्या उमेदवारास चांगले वातावरण असून भाजपच्या खासदाराकडून विकास तसेच बेरोजगार युवकांसाठी रोजगाराभिमुख प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न थिटे पडल्याने, इंडीच्या उमेदवारास निवडून देण्याचे आवाहन कळंगुटकर यांनी मतदाराशी बोलताना व्यक्त केले.