टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; कर्णधारपदी रोहित शर्मा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th April, 04:28 pm
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; कर्णधारपदी रोहित शर्मा

नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup ) भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली असून संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. तर हार्दिक पंड्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

टी-20 विश्वचषक स्पर्धा १ जून सुरू होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेकडून संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. आयसीसीने (ICC) स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांना संघ जाहीर करण्यासाठी १ मेची मुदत दिलेली होती. भारतीय चाहते या विश्चचषकाच्या संघात कुणाला संधी मिळणार, याची वाट पाहत होते. अखेर आज सायंकाळी हा सस्पेन्स संपला आहे. बीसीसीआयने १९ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

टी-20 विश्वचषकामध्ये भारत ‘अ’ गटात आहे. भारताची पहिली मॅच आयरलँड विरुद्ध होणार असून दुसरी मॅच पाकिस्तान विरुद्ध होईल. वर्ल्ड कपमधील हाय व्होल्टेज लढत भारत आणि पाकिस्तान ९ जूनला आमने सामने येणार आहेत. भारताची तिसरी मॅच यूएस आणि चौथी मॅच १५ जूनला कॅनडाविरुद्ध होणार आहे.

असा आहे भारतीय संघ...

१. रोहित शर्मा (कर्णधार)
२. हार्दिक पांड्या (उपकर्णधार)
३. यशस्वी जयस्वार (सलामीवर)
४. विराट कोहली
५. सूर्यकुमार यादव
६. ऋषभ पंत (यष्टिरक्षक)
७. संजू सॅमसन (यष्टिरक्षक)
८. शिवम दुबे
९. रवींद्र जेडजा
१०. अक्सर पटेल
११. कुलदीप यादव
१२. यजुवेंद्र चहल

१३. अर्शदीप सिंग
१४. जसप्रीत बुमराह
१५. मुहंमद सिराज
१६. ‍शुभमन गील
१७. रिंकू सिंग
१८. खलिफ अहमद
१९. आवेश खान