सिक्वेरांच्या पुतळ्यासाठी येणार कॉंग्रेसचाही खासगी ठराव

कॉंग्रेस विधिमंडळ गटाच्या बैठकीत निर्णय; विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांची माहिती


02nd February 2018, 06:58 pm
सिक्वेरांच्या पुतळ्यासाठी येणार कॉंग्रेसचाही खासगी ठराव

गोव्याचे पहिलेविरोधी पक्षनेते डॉ. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा संकुलात बसवण्यासाठीविधानसभेत खाजगी ठराव मांडण्याचा काँग्रेस विधीमंडळ गटाच्या बैठकीत निर्णय झालाआहे. शुक्रवारी झालेल्या काँग्रेस विधीमंडळ गटाच्या बैठकीत हा ठराव पुढे आणण्यातआला. गोवा फॉरवर्ड पक्ष व  कळंगुटचेभाजपाचे आमदार मायकल लोबो यांनीही डॉ. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा संकुलातउभारण्यासाठी खाजगी ठराव मांडण्याची तयारी यापूर्वीच दर्शवली आहे.