काणकोणात ‘कासादोर’ चा बंदुकीची गोळी लागून संशयास्पद मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th April, 10:34 am
काणकोणात ‘कासादोर’ चा बंदुकीची गोळी लागून संशयास्पद मृत्यू

काणकोण : सकरेन्हाळ येथे दारूचे दुकान चालवणाऱ्या विल्सन फर्नांडिस यांचा बंदुकीची गोळी लागून संशयास्पद मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार विल्सन हा आसपासच्या गावांत शिकारी म्हणजेच कासादोर म्हणून प्रसिद्ध आहे. नेहमीप्रमाणेच आपल्या बंदुकीची साफसफाई करून ती शिकारीसाठी तयार करताना त्याच्या चुकीमुळेच गोळी सुटून हा अपघात घडला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

दरम्यान, पोलिसांनी न्यायवैद्यक पथकाला पाचारण केले असून, त्यानंतरच विल्सन यांच्या मृत्यूचे नेमके कारण उजेडात येऊ शकेल असे पोलिसांनी सांगितले. तरीही हा प्रकार घातपाताचा नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.  काणकोणचे पोलीस निरीक्षक हरिष राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पूढील तपास सुरू आहे.  

हल्लीच केपे- काणकोणच्या सिमेवरील पर्येमळ - खोला येथे ७ एप्रिल रोजी माटवेकारांच्या देवाच्या पारंपरिक भोंवडीच्या वेळी रान डुकराने चकवा दिल्यामुळे भोंवंडीत सहभागी एका व्यक्तीला बंदुकीची गोळी लागल्यामुळे प्राण गमवावा लागला होता.  

हेही वाचा