पोलिस खेळाडूंवर खात्याकडून निर्बंध

पूर्वपरवानगी आवश्यक, दुसऱ्या संघाकडून खेळण्यास मनाई


05th February 2018, 11:25 pm
पोलिस खेळाडूंवर खात्याकडून निर्बंध


पोलिस खात्यातील काही खेळाडू खात्याकडून पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय विविधस्पर्धांत खेळत आहेत. पोलिस संघ सहभागी झालेल्या स्पर्धांमध्ये खात्यातील खेळाडूविरोधी संघांमार्फत खेळण्याच्या प्रकारामुळे पोलिस खात्याला पेचप्रसंगाला सामोरेजावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे पोलिस खात्यातील खेळाडूंवर निर्बंधलादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिस खात्यातील खेळाडूंना कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी खात्यातीलनियंत्रण अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच, पोलिस खात्याचा संघ सहभागीहोत असलेल्या कोणत्याही स्पर्धेत पोलिस खेळाडूंना अन्य संघाकडून खेळता येणार नाही,असे पोलिस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आलेआहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांना शिस्तभंग कारवाईला सामोरे जावेलागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.